MSP Procurement : शेतीमाल खरेदीत व्यापाऱ्यांच्या गैरकारभाराला बसणार चाप

टीम ॲग्रोवन

अकोला ः केंद्र शासनाच्या हमीभावानुसार राज्य सरकारकडून शेतमालाची खरेदी केली जाते. या खरेदी प्रक्रियेत अनेकदा व्यापारीच हात मारत असल्याची बाब लपून राहिलेली नाही.

Wheat Market | Agrowon

अशा गैरकारभाराला चाप लावण्यासाठी आता नोंदणी करताना तसेच प्रत्यक्ष शेतमाल विक्री करताना शेतकऱ्याचे छायाचित्र काढले जाणार आहे. अशा सूचनाच आता काढण्यात आल्या असून त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे.

Storage | Agrowon

हंगामात शासकीय केंद्रावर हमीभावाने विविध शेतमालाची खरेदी केली जाते. सध्या खरेदी केली जाणार आहे. त्यासाठी नाव नोंदणीची प्रक्रिया राबविली जात आहे.

Documents | Agrowon

नोंदणीसाठी चालू हंगामाचा अद्ययावत सातबारा, बँक पासबुक झेरॉक्स व इतर कागदपत्रे मागितली जात आहेत. सोबतच आता प्रथमच छायाचित्रही काढणे गरजेचे केले आहे.

Wheat Market | Agrowon

जो शेतकरी हमीभाव केंद्रावर आपला शेतमाल विक्रीसाठी नोंदणी करेल, त्याचे छायाचित्र काढण्यात येईल.

Storage | Agrowon

शिवाय प्रत्यक्ष शेतमाल विक्रीला आणतानासुद्धा तोच शेतकरी लागेल. अन्यथा शेतमाल विकता येणार नाही.

Market | Agrowon

शासकीय केंद्रावर व्यापाऱ्यांकडून होत असलेल्या विक्रीला चाप लावण्यासाठी हा उपाय शोधण्यात आला आहे.

Crop Harvesting | Agrowon

आता नोंदणीपासून तर विक्रीपर्यंत खबरदारी घेणे सुरु केल्याने किमान यामुळे तरी गैरप्रकार थांबतील, अशी अपेक्षा आहे.

Storage | Agrowon

शिवाय अशा उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांनाही फायदा होईल, असा दावा केला जात आहे.

Agricultural Storage | Agrowon
cta image | Agrowon