Team Agrowon
ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन १३ ते १६ जानेवारी दरम्यान औरंगाबाद येथील चिकलठाणा परिसरात आयोजित करण्यात आले.
या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल, अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचेही प्रदर्शन भरवण्यात आले.
धान्य स्वच्छ करणाऱ्यासाठी दालमिल निर्माण करण्यात आले आहे.
या मशिनमधून तूर डाळ, चना डाळ, मूग डाळ, उडीद डाळ, मसूर डाळ आणि मटकी डाळ तयार करता येते.
तसेच गहू साफ करून त्यातील काडीकचरा स्वच्छ करता येतो.
गहू साफ करताना ताशी ५०० किलो माल साफ करून देते.