Marigold Rate : नवरात्रीमुळे झेंडूला उठाव

Anil Jadhao 

नवरात्रीमुळे फुलांना उठाव मिळतोय. यापूर्वी गणपती उत्सवात फुलांना चांगला दर मिळाला होता. आता नवरात्रीमुळं फुलांची मागणी वाढली आहे.

नवरात्रीसाठी बाजारात झेंडूची आवक होतेय. शेतकरी नवरात्रीसाठी झेंडू लागवडीचे नियोजन करत असतात.

मात्र नुकत्याच झालेल्या पावसानं झेंडूच्या फुलांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळं झेंडूची आवक मर्यादीत होत आहे.

सध्या झेंडूला प्रतिक्विंटल ४ हजार ते ७ हजार रुपयांचा दर मिळत आहे. तर प्रतिकिलो ४० रुपये ८० रुपये दर मिळत आहे. 

दसऱ्याच्या काळात झेंडूला मागणी वाढून दरात आणखी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज फूल व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.

मागील काही दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागांत पाऊस झाला. या पावसामुळे झेंडू पिकाचे नुकसान झाल्याचे शेतकरी सांगतल आहेत.

cta image