Team Agrowon
प्रवीण तरडेचा ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटात चहावाली अभिनेत्री मालविका गायकवाडला चांगली ओळख मिळाली.
या चित्रपटातील शेती ईकायची नसते, शेती राखायची असते,' हा संवाद खूप गाजला. नुसत चित्रपटात काम न करता अभिनेती मालविकाला चित्रपटातून तिला शेती राखण्याची प्रेरणा मिळाली'
तिने आपल्या दोन मित्रासोबत शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी शिरूर येथे दीड एकर शेती घेतली
या शेतावर सेंद्रिय पीकांचे उत्पादन घेतात. तसेच त्याची विक्री करण्यासाटी ‘द ऑरगॅनिक कार्बन’ नावाची कंपनी सुरू केली.
त्यांची कंपनी दुग्ध व्यवसायातही उतरली आहे. त्यांनी ‘हंपी ए 2’ नावाची ब्रॅंड बाजारात आणला आहे.
त्यांच्या कंपनीत दूध, तूप, दही,पनीर साच सोबत मिल्क ऑइल, कोकोनट ऑइल यासारखे अनेक पदार्थ बनू लागले.
या कंपनीने मागील वर्षी 18 कोटींची उलाढाल केली. त्यामध्ये त्यांना सरासरी 4 कोटींचा नफा झाला आहे.
आयटी क्षेत्रातील नोकरी, चित्रपटातील ग्लॅमर, पैशा पेक्षा तिला शेतीतून समाधान मिळत आहे.