National Farmer's Day 2022 : राष्ट्रीय शेतकरी दिवस का साजरा केला जातो?

Team Agrowon

चौधरी चरण सिंह यांनी शेतकऱ्यांचं आयुष्य आणि परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक धोरणांची सुरुवात केली होती.

Chaudhary Charan Singh | Agrowon

चौधरी चरण सिंग यांचा जन्म चौधरी मीर सिंग व नेत्रा कौर यांच्या परिवारात, २३ डिसेंबर १९०२ रोजी, उत्तरप्रदेश राज्यातील मेरठ येथील नूरपूर या गावी झाला.

Chaudhary Charan Singh | Agrowon

गरिब परिस्थितीत शिक्षण घेतलेल्या चरण सिंग यांनी याच उत्तरप्रदेश राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली व पुढे भारताचे ५ वे पंतप्रधान म्हणून पद ग्रहण केले.

Chaudhary Charan Singh | Agrowon

राजकारणात वेगवेगळ्या पदांवर कार्यरत असतानाही त्यांनी प्रत्येक वेळी आपले लक्ष गरीब, मजूर, शेतकरी यांच्या प्रश्नांकडे ठेवले.

Chaudhary Charan Singh | Agrowon

चौधरी चरण सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असताना जमीनदारी रद्द केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी लेखापद पद बनवलं.

Chaudhary Charan Singh | Agrowon

२८ जुलै १९७९ ते १४ जानेवारी १९८० या काळात ते देशाचे पंतप्रधान होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी देशातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या संदर्भातील सुधारणांबाबतचे बिल सादर करत कृषी क्षेत्रात आपली भूमिका ठामपणे मांडली होती.

Chaudhary Charan Singh | Agrowon
cta image | Agrowon