मनोज कापडे
आज घरी वासुदेव आले होते. ते मूळचे बुलढाण्याचे. "उदरनिर्वाहासाठी परंपरागत व्यवसाय जपतो आहे. वडिलांच्याच या चिपळ्या मी आज वापरतो आहे," असे ते आनंदाने सांगत होते.
सह्याद्रीच्या कुशीतील शेतकऱ्याच्या घरात श्रीमंती किचन किंवा झगझगीत दिवेही नसतात; पण माया, समाधान, शांतता असते.
या मावशींनी भल्या सकाळी गोठा साफ केला. धारा काढल्या. मग आदराने मला चुलीवरचा चहा करून दिला..!
सह्याद्री पर्वतरांगेतील माता अंजनीचे काल दर्शन घेतले.
पर्वतावर रुईचे सुंदर फूल बहरले होते..!
पर्वतावरील कातळ कड्याच्या काठावरील एक सकाळ..!