Onion Subsidy : कांदा अनुदानासठी पीकपेरा सक्ती रद्द करा ; जामखेडमध्ये राष्ट्रवादीचा मोर्चा

Team Agrowon

लेट खरीप कांद्याचे दर कोसळल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला होता.

Onion Subsidy | Agrowon

संकटात सापडलेल्या कांदा उत्पादकांना मदत म्हणून राज्य सरकारने अनुदान देण्याची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केली.=

Onion Subsidy | Agrowon

मात्र, कांदा अनुदानासाठीच्या निकषांमध्ये ई-पीक पेऱ्याची नोंदीची अट घालण्यात आली आहे.

Onion Subsidy | Agrowon

कांदा अनुदानासाठी ऑनलाईन पीक पेऱ्याची सक्ती रद्द करण्याच्या मागणीसाठी जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मोर्चा काढण्यात आला.

Onion Subsidy | Agrowon

कांदा उत्पादकांसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. जामखेडच्या तहसील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला.

Onion Subsidy | Agrowon

यावेळी कांदा अनुदानासाठी पीक पेरा सक्ती रद्द करण्यासाठीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

Onion Subsidy | Agrowon

दरम्यान, लेट खरीप म्हणून कांदा पीकपेरा नोंद न लावल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना कांदा अनुदान मिळविण्यासाठी अडचणी येत आहेत.

Onion Subsidy | Agrowon
Mango On EMI | Agrowon