Kokan Kapila : क्षण भाग्याचा.... कोकण कपिला गोसंवर्धनाचा...

अमित गद्रे

गोवंश संवर्धनासाठी चैतन्यवाडी प्रकल्प अंतर्गत आंबा (ता.शाहूवाडी, जि. कोल्हापूर) गावात दोन वर्षांपूर्वी मी, माझे बंधू सुनील गद्रे, मित्र बंधू प्रसाद बेंडके यांनी मिळून शिवसमर्थ कोकण कपिला गोशाळा व संशोधन संस्था सुरू केली.

Kokan Kapila | Agrowon

गावातील पशुपालकांची आम्हाला साथ मिळाली. जातिवंत, दुधाळ कोकण कपिला पुन्हा एकदा शेतकरी, बागायतदाराच्या गोठ्यात असावी हे आमचे स्वप्न. डोंगर कुरणात चरणारी ही गाय असल्याने तिचे दूध हे त्रिदोषनाशक.

Kokan Kapila | Agrowon

दुधापासून ताक, लोणी, तूप याच बरोबरीने शेण, गोमूत्रपासून सेंद्रिय खत, कीटकनाशक, गोखुर खत, गांडूळ खत, धुपकांडी, मसाज तेल आदी १२ प्रकारची उत्पादने तयार करून स्वयंपूर्ण गोठा या संकल्पनेवर आम्ही भर दिला आहे. अजून विविध प्रयत्न सुरू आहेत.

Kokan Kapila | Agrowon

आज (२५ नोव्हेंबर) या पुढील महत्त्वाचे पाऊल आम्ही टाकले. दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाबरोबर कोकण कपिला गोवंश संवर्धन, संशोधन आणि पशुपालकांच्यामध्ये तंत्रज्ञान विस्तार करण्यासाठी आणि या गोवंशाला पुन्हा एकदा प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी संशोधन आणि सहकार्य करार करण्यात आला.

Kokan Kapila | Agrowon

विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय सावंत, संशोधन संचालक डॉ. संजय भावे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत, सहयोगी अधिष्ठाता आणि पशु संवर्धन विभाग प्रमुख डॉ.बी. जी. देसाई, पशु तज्ञ डॉ. प्रसादे, अर्थ तज्ञ डॉ. तोरणे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा करार संपन्न झाला.

Kokan Kapila | Agrowon
cta image | Agrowon