भुईमूग,सोयाबीन लागवडीचे क्षेत्र वाढवा

Devendra Shirurkar

खाद्यतेलाची गरज भागवण्यासाठी भारताने पामतेल लागवडीखालील क्षेत्र वाढवण्याचा हव्यास सोडावा. त्याऐवजी भुईमूग, सोयाबीनसारख्या तेलबिया लागवडीवर भर देण्याची गरज इंडियन व्हेजिटेबल ऑइल प्रोड्युसर्स असोसिएशनने व्यक्त केली आहे.

Palm Oil | Agrowon

दुबई येथे आयोजित ग्लोबॉईल इंटरनॅशनल 2022 च्या सत्रात बोलताना इंडियन व्हेजिटेबल ऑइल प्रोड्युसर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर देसाई यांनी ही गरज व्यक्त केली आहे.

soyabean | Agrowon

भारतात सुमारे २० लाख हेक्टर क्षेत्रात पामतेलाची लागवड होऊ शकते. हेक्टरी २ ते ४ टन उत्पादन गृहीत धरले तरीही त्यातून भारताला ३० ते ४० लाख टन पामतेल मिळू शकते, असा अंदाज देसाई यांनी व्यक्त केला आहे.

sunflower | Agrowon

बाहेरच्या देशातून पाल तेल आयात करण्यापेक्षा देशांतर्गत खाद्य तेलाच्या उत्पादनावर भर देण्याची गरज असल्याचे देसाई म्हणाले आहेत.भुईमूग, सोयाबीन, मोहरी, सूर्यफूल, यांसारख्या तेलबियांच्या लागवडीचे क्षेत्र नियोजनपूर्वक वाढवता येईल.

Ground Nut | Agrowon

गहू आणि भातपिकाच्या लागवडीखालील ६० ते ७० लाख एकराचे क्षेत्र तेलबिया लागवडीखाली आणता येणे शक्य आहे.

Mustard | Agrowon

जनुकीय सुधारित सोयाबीन आणि मोहरी बियाण्यांचा वापर केला तर देशांतर्गत गरज भागवून आपण मोहरी, सोयापेंडीची निर्यातही करू शकतो, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला आहे.

Edible Oil | Agrowon

आजमितीस देशाला ६५ ते ७० टक्के खाद्यतेलाची आयात करावी लागते. खाद्यतेल अभियानाच्या माध्यमातून येत्या ५ ते ७ वर्षात ही आयात ३५ ते ४० टक्क्यांवर येऊ शकेल, असा अंदाज देसाई यांनी वर्तवला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Edible Oil | Agrowon