Sharad Pawar : पुन्हा एकदा शरद पवार पावसात भिजले

Team Agrowon

शरद पवार यांनी २ मे रोजी 'लोक माझे सांगाती' या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला

sharad pawar | agrowon

पवारांच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांना धक्काच बसला. त्यांनी कार्यक्रमस्थळी जयंत पाटील, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक जण भावूक झाले

sharad pawar | agrowon

पवारांनी घेतलेल्या निर्णयाने जनमानसामध्ये तीव्र भावना उमटली. राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी हा निर्णय मागे घेण्यासाठी आंदोलन केले

sharad pawar | agrowon

पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांच्या भावनांचा आग्रहाने शरद पवारांनी आपला राजीनामा मागे घेत पुनश्च अध्यक्षपदाची जबाबादारी स्वीकारत असल्याचे जाहीर केले.

sharad pawar | agrowon

या राजीनामा नाट्यानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार यांनी फलटण तालुक्यातील डाळींब शेतकऱ्याच्या बागेला भेट दिली.

sharad pawar | agrowon

पंढरपूर दौर्‍यावर असताना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला भेट देऊन विठ्ठल-रखुमाईचे मनोभावे दर्शन घेतले. त्यानंतर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या नव्या बायो सीएनजी प्रकल्पाचा शुभारंभ केला

sharad pawar | agrowon

सांगोला येथील जेवीकॉन राजलक्ष्मी ऑरगॅनिक्स प्रा. लि. ॲग्रीकल्चर रिसर्च व ॲनॅलिटिकल सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी शेतकरी मेळाव्यास संबोधित केले.

sharad pawar | agrowon

पंढरपूर, सांगोला दौरा आटोपून सोलापूर शहराचे माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्यात शरद पवारांनी हजेरी लावली. यावेळी भर पावसात नववधू आणि वराला शुभेच्छा दिल्या. 

sharad pawar | agrowon
banana | agrowon