Team Agrowon
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा आठवा दिवस आहे.
महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली बजेटमध्ये महाराष्ट्राला मिळाला भोपळा म्हणत बजेटवर टीका केली.
बजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा...बजेट म्हणजे रिकामा खोका...
सर्वसामान्यांना मिळाला भोपळा... सत्तेत कामी आले खोके, सर्वसामान्यांना मात्र धोके... अशा घोषणा देत विधानभवनाच्या पायर्यांवर येत शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पाचा निषेध केला.
यावेळी महाविकास आघाडी सरकारचे नेते मंडळी उपस्थित होते.
सरकारच्या अर्थसंकल्पाच्या विरोधात घोषणा देत विधिमंडळ परिसर दणाणून सोडला.