Orange Market : संत्री दर दबावात

Anil Jadhao 

राज्यातील संत्री आता बाजारात दाखल होत आहे. विदर्भातील संत्रा उत्पादक पट्ट्यात सध्या संत्रा काढणी सुरु आहे.

मात्र सध्या संत्रीला कमी दर मिळत असल्यानं शेतकरी अडचणीत आले आहेत. सध्या संत्र्याला सरासरीपेक्षा कमीच आहे.

संत्र्याला मागणी वाढल्यानंतर दरात काहीशी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.

सध्या संत्र्याला प्रतिक्विंटल २ हजार ५०० ते ६ हजार रुपये दर मिळतोय. तर कमीत कमी २ हजारांपासून दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची गोची झाली.

चालू हंगामात पिकाला पोषक वातावरण नव्हते, परिणामी संत्र्यामध्ये गोडी उतरली नाही.

काही ठिकाणी कीड-रोगामुळे गुणवत्ता कमी झाली. याचा फटका आता संत्रा पिकाला बसत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.