Palm Oil Market : पामतेल उत्पादन यंदा वाढणार

Anil Jadhao 

एकूण जागतिक खाद्यतेल पुरवठ्यात पामतेलाचा वाटा जवळपास ३० टक्के आहे. पामतेलाच्या पुरवठ्याचा परिणाम जागतिक खाद्यतेल बाजारावर होत असतो. 

मागीलवर्षी इंडोनेशियातील पामतेल उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी राहीले होते. परिणामी जागतिक बाजारात खाद्यतेलाच्या दरात मोठी तेजी आली होती. पण यंदा येथील पामतेल उत्पादन वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पाम तेल असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, २०२१ या वर्षात इंडोनेशियामध्ये ५१३ लाख टन पामतेलाचे उत्पादन झाले होते. ते ५१८ लाख टनांवर पोचेल.

सप्टेंबर महिन्यापर्यंत इंडोनेशियात ३७० लाख टन पामतेल हाती आले होते. त्यापैकी इंडोनेशियाने २२० लाख टनांची निर्यात केली आहे.

मागील काही महिन्यांपासून रशिया आणि युक्रेनमधील युध्द आणि इंडोनेशियाच्या पामतेल धोरणामुळे खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ झाली होती. यामुळे आय़ातीवर अवलंबून असलेल्या देशांना मोठ्या आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागले होते.

इंडोनेशियात यंदा ५१८ लाख टन पामतेल उत्पादनाची आशा आहे. यात ४७० लाख टन कच्चे पामतेल तर ४८ लाख टन कच्च्या पाम कार्नेल तेलाचा समावेश असेल. यंदा पामतेलाची निर्यात ३०० लाख टनांवर पोचण्याचा अंदाज आहे.

cta image