मनोज कापडे
आज भटकंतीत मित्रांसोबत होतो.
दोघे भाऊ कडाडून भांडत होते.
आई-बाबा उत्सुकतेने त्या भावंडांची मस्ती पहात होते.
त्यांनी हस्तक्षेप केला नाही.
शेवटी दोघा भांडखोरांना शेंगदाणे देत ही कुस्ती मी कशीबशी सोडवली..!
सह्याद्रीच्या रानातील माणसं : भल्या सकाळी देवपूजा करीत रानात गवत कापण्यासाठी काठी टेकत बाबा निघालेले डोंगराकडे आहेत. देव आणि कष्टावर त्यांची समसमान श्रध्दा होती..!