Sahyadri Photoshoot : निखळ आनंदाचे झरे

मनोज कापडे

इकडे निसर्गात झाडे स्थिर असूनही मुक्त जगतात; तिकडे शहरात माणूस मुक्त असूनही बंदिवान असतो..!

Sahyadri Photoshoot | मनोज कापडे

आज जोंधळ्याच्या रानात.. पाखरासंगे..!

Sahyadri Photoshoot | मनोज कापडे

निळ्या आभाळातील निसर्गाने काढलेले एक चित्र..!

Sahyadri Photoshoot | मनोज कापडे

विज्ञान आणि निसर्ग यांचा मिलाफ होतो; तेव्हा सूर्योदय अधिक आल्हाददायक भासतात..!

Sahyadri Photoshoot | मनोज कापडे

सोबत कोणी नसेल तेव्हा आजूबाजूची झाडीवेली आणि वाटेतील दगडधोंडे न्याहाळावीत; तीदेखील एकटी असतात. शेवटपर्यंत निःस्वार्थी साथ देतात..!

Sahyadri Photoshoot | मनोज कापडे

नकळत गोड निसर्ग गीत गुणगुणत पर्वत मी उतरू लागलो. या जन्मावर, या जगण्यावर, शतद: प्रेम करावे..!

Sahyadri Photoshoot | मनोज कापडे

महामार्गावर सरकणारी वाहनांची रांग जणू काही शुभ्र प्रकाशाची एक नदी होऊन वाहत होती. शहरातील दिवे चांदण्यागत चमकत होते..!

Sahyadri Photoshoot | मनोज कापडे

आज भटकंती करताना पठारावर खूप सारी रानफुले भेटली. पांढऱ्या शुभ्र पाकोळ्यांचे थवे उडावेत तशी ही रानफुले वाऱ्यावर डोलताना दिसत होती..!

Sahyadri Photoshoot | मनोज कापडे
cta image | Agrowon