Goat Rearing : उन्हाळ्यात शेळ्यांच्या आहाराचे नियोजन कसे करावे?

Team Agrowon

झाडपाल्याची जास्त गरज

शेळ्यांना झाडपाल्याची जास्त गरज असते. शेळ्यांना दररोज पाच किलो हिरवा चारा, एक किलो वाळलेल्या चाऱ्याची आवश्‍यकता असते.

Goat Rearing | Agrowon

मांसवाढीसाठी पूरक घटक

उपलब्ध हिरवा चारा शेळ्यांना द्यावा. मांसवाढीसाठी पूरक घटक चाऱ्यामधून मिळत नाहीत. म्हणून चाऱ्यामध्ये इतर घटकांचा वापर करावा जसे की क्षार मिश्रण, प्रतिजैविके इ.

Goat Rearing | Agrowon

मांस उत्पादन वाढण्यास मदत

चाऱ्यासोबत विकरांचा वापर केल्यास चाऱ्याची पचनीयता वाढते. त्यामुळे शरीराला पौष्टिक घटक मिळून मांस उत्पादन वाढण्यास मदत होते.

Goat Rearing | Agrowon

प्रोबायोटिक्‍सचा वापर

प्रोबायोटिक्‍सच्या वापरामुळे ओटीपोटाला आवश्‍यक असणारे सूक्ष्म जीव मिळून पचनक्रिया जलद होते. यामुळे मांस उत्पादन वाढते तसेच शेळीची प्रकृती चांगली राहते.

Goat Rearing | Agrowon

क्षार मिश्रणाचा वापर

आहारामध्ये क्षार मिश्रणाचा वापर केल्यास कमतरतेचे आजार कमी होऊन मांस उत्पादन वाढते. प्रतिजैविकाचा वापर केल्यास शेळीची रोगप्रतिकारक क्षमता वाढते व आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते.

Goat Rearing | Agrowon

चरण्यासाठी सोडणे

शेळ्यांना सकाळी लवकर (६ ते ९) किंवा (रात्री ५ ते ७) या वेळेत चरण्यासाठी सोडावे. चरून आल्यानंतर शेळ्यांना सावलीतच बांधावे.

Goat Rearing | Agrowon