Polyhouse : पॉलिहाउस धारकांची संख्या का घटतेय?

Team Agrowon

बहुतांशी शेतकरी पॉलिहाउस काढून अन्य पिकांकडे वळले आहेत. अगदी मातब्बर शेतकऱ्यांनी ही पीक बदलाचा मार्ग स्वीकारला आहे.

Polyhouse Farming | Agrowon

२०१९ पासून सातत्याने पॉलिहाउसच्या संख्येत घट होत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

Polyhouse Farming | Agrowon

ज्या पॉलिहाउसधारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना शेतीपिक नुकसानभरपाई किंवा कर्जमाफीत समावेश नसल्याने भरपाई मिळत नाही,

Polyhouse Farming | Agrowon

निर्यात फारशी नसल्याने पॉलिहाउस व्यवसाय वाढीला खीळ बसली आहे. त्यामुळे जिल्ह्यात १२०० हून अधिक पॉलिहाउसपैकी सध्या जेमतेम ३५० वर नोंदणीकृत पॉलिहाउस शिल्लक आहेत.

Polyhouse Farming | Agrowon

२००० ते २००५ या कालावधीत जिल्ह्यात पॉलिहाउसची संख्या १२०० च्या आसपास होती. छोट्या शेतकऱ्यांबरोबर मोठे उद्योग समूह या व्यवसायात उतरल्याने फूल, फळे आदींची वर्षाला कोट्यवधी रुपयांची निर्यात होत होती.

Polyhouse Farming | Agrowon

जसा कोरोना आला तसे पॉलिहाउसधारकांचे धाबे दणाणले. ठप्प झालेली फुलाची मागणी अपवाद वगळता अजूनही पूर्वपदास येण्यास तयार नसल्याने अनेकांना कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.

Polyhouse Farming | Agrowon
Chana Pod Borer | Agrowon