कापूस गाठींमध्ये घट होण्याची शक्यता

Team Agrowon

जागतिक बाजारात (World Markets) चालू हंगामात कापूस (Cotton) सुरवातीपासूनच तेजीत आहे. उद्योगाची मागणी वाढली. परंतु बाजारात पुरवठा कमी आहे. त्यामुळे दर ११ वर्षांतील उच्चांकावर पोहोचले.

देशातही कापूस उत्पादन वापराच्या तुलनेत घटले आहे. त्यामुळे कापसाच्या दराने विक्रम गाठला. सध्याही कापसाचा बाजारभाव 11 हजार ते 13 हजार रुपयांच्या दरम्यान आहे. यंदा पाऊस आणि कीड-रोगाने कापसाचे उत्पादन घटले.

चालू हंगामात कापूस उत्पादनात मोठी घट झाली आहे. देशातील कापूस उत्पादन ३१५ लाख गाठींवरच स्थिरावेल, असे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने (सीएआय) प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. तर कापूस वापरही एवढाच होईल, असा अंदाज व्यक्त केला.

३१ मेपर्यंत देशातील बाजारांत २८८ लाख गाठी कापूस आला आहे. एकूण उत्पादनाच्या ९१.४५ टक्के कापसाची विक्री झाल्याचे ‘सीएआय’ने म्हटले आहे.

अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या अहवालातही ‘सीएआय’ने मागील अंदाजाच्या तुलनेत ८ लाख ३१ हजार कापूस गाठींची कापत केली. एक कापूस गाठ १७० किलोची असते. देशात जवळपास ३२४ लाख गाठी कापूस उत्पादन होईल, असा अंदाज एप्रिल महिन्यात वर्तविला होता.

उत्पादनातील घट आणि वाढलेला वापर यामुळे पुढील हंगामासाठीचा शिल्लक साठा ४७ लाख टनांपर्यंत कमी राहील, असेही ‘सीएआय’ने स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.