APMC Band : पुणे मार्केट यार्ड बंद

Anil Jadhao 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. तसेच इतरही नेत्यांनी महापुरषांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने पुण्यात बंद पुकारला होता.

महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदमुळे पुणे मार्केट यार्डही बंद होते. त्यामुळे बाजारात भाजीपाला, फुले, फळे आणि धान्याचे व्यवहार होऊ शकले नाहीत.

एरवी गजबज असलेले मार्केट यार्ड आझ असे ओस पडले होते. सगळीकडे शुकशुकाट पाहायला मिळाला.

भल्या पहाटे मार्केट यार्डात भाजीपाला, फळे आणि फुले घेऊन शेतकऱ्यांची वाहने येत असतात. मात्र आज असे चित्र पाहायला मिळाले.

विक्रेते आणि खेरदीदार बाजारात नसल्याने आवारत शुकशुकाट होता.

बाजार समितीचे आवार असे खालीखाली होते.

cta image