Team Agrowon
महाराष्ट्र केसरी ठरलेल्या पैलवान अभिजीत कटकेने आता हिंदकेसरी खिताब पटकावला आहे.
हैदराबाद येथे झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत अभिजीत कटकेने खुल्या गटातून हा मान मिळाला.
अंतिम फेरीत त्याने हरियाणाच्या सोमवीरचा ५-० असा पराभव केला.
हिंदकेसरी कुस्तीचं आयोजन भारतीय शैली कुस्ती महासंघाच्या वतीनं करण्यात आलं.
पहिल्या फेरीत चार गुणांची आघाडी घेतलेल्या अभिजितने सोमवीरला आक्रमणाची संधी मिळू दिली नाही.
गुणांची बढत घेऊन सोमवीरवर दबाव वाढवला. दुसऱ्या फेरीत नकारात्मक कुस्ती करीत असल्याने पंचांनी सूचना देऊन तीस सेकंदात गुण घेण्याची सोमवीरला सूचना दली.
मात्र तीस सेकंदात तो अभिजितचा भक्कम बचाव भेदण्यात अयशस्वी ठरल्याने पंचांनी अभिजितला एक गुण दिला.
शेवटच्या मिनिटांत सोमवीर आक्रमक झाला मात्र अभिजितपुढे त्याची डाळ शिजली नाही. पाच विरुद्ध शून्य गुणांची कमाई करून अभिजितने प्रतिष्ठेची लढत खिशात टाकली.