Rabbi Season : रब्बी ज्वारीला चांगले दिवस येणार ?

Team Agrowon

यावर्षी विहीरीत आणि शेततळ्यात भरपूर पाणी असतानाही रब्बीची पिकं घ्यायची नाहीत असा विचारपूर्वक निर्णय घेतला.फक्त एक एकरवर बडी ज्वारी(जोंधळा) पेरलीय...आणि चार एकरवर बरू(बोरू).

महारुद्र मंगनाळे

गेली सहा-सात वर्षे जनावरांना चारा म्हणून रब्बीला भरपूर ज्वारी पेरायचो.त्याचा कापणीचा खर्च एवढा व्हायचा की,तो चारा विकत घेतल्यासारखं व्हायचं.

महारुद्र मंगनाळे

शिवाय कोरोना काळात बसलेले जनावरांचे बाजार अद्याप उठले नाहीत.त्यात लंपी या आजाराची भर पडली.

महारुद्र मंगनाळे

गेल्या तीन वर्षांतील म्हशीपालनाचा ताळेबंद बघितला तेव्हा लक्षात आलं,शेणाशिवाय काहीच शिल्लक राहात नाही.मग एवढी गाढव मेहनत करायची कशासाठी?

महारुद्र मंगनाळे

३५जनावरं होती... गाई-म्हशी,वासरं मिळून ही संख्या नऊवर आणली.महिना- दिड महिन्यात यातील चार जनावरं कमी होतील.दुधाची एक म्हैस आणि दोन गाई एवढीच जनावरं ठेवायचा निर्णय केला.

महारुद्र मंगनाळे

गेल्या महिन्यात सविताशी चर्चा करून निर्णय केला,कमीत कमी ताण होईल अशीच शेती आता करायची.जेवढी शेती अधिक,त्यात जेवढी पिकं जास्त तेवढा ताण अधिक.माणसांचा ताण वैताग आणणारा आहे.

महारुद्र मंगनाळे

कमीत कमी जोखमीची, कमीत कमी मनुष्यबळ लागणारी पिकं घ्यायची.खरिपाला शक्यतो फक्त सोयाबीन घ्यायचं.त्याचा ताण मर्यादित काळासाठीच असतो.. आमच्या हलक्या जमिनीत आज तरी सोयाबीनला पर्याय नाही.

महारुद्र मंगनाळे
cta image | Agrowon