Sugarcane Crushing: पावसाच्या शक्यतेने ऊस तोडीवर परिणाम

Team Agrowon

मनडूस चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मागील काही दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण आहे. तर काही ठिकाणी पावसाच्या सरीही पडत आहेत.

गेले चार ते पाच दिवस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ढगाळ व पावसाचे वातावरण आहे. काही ठिकाणी पाऊसही झाला.

पाऊस झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत. पाऊस आणि पावसाच्या शक्यतेने ऊस तोडीवर परिणाम होत आहे.

ढगाळ वातावरण असल्यामुळे कधी पाऊस पडेल सांगता येत नाही. पाऊस पडला तर वाहने शेतात अडकून पडण्याची शक्यता आहे.

ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूकदार रस्त्या लगतच्या किंवा जवळपाच्या फडातील ऊस तोडणीला प्राधान्य देत आहेत. ऊस तोडणीवर भर देत आहेत.

सध्या ऊस काढणीला आला आहे. त्यामुळे आपला ऊस लवकरात लवकर तोडवा यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहेत. मात्र पाऊस ढगाळ वातावरणामुळे त्याला ब्रेक बसत आहे.

cta image