Rice Production : तांदूळ का महागला ?

Team Agrowon

तांदळाचे भाव (Rice Rate) झपाट्याने वाढत आहेत. गेल्या आठवड्याभरात तांदळाच्या दरात (Rice Market) प्रतिकिलो पाच रुपयांची वाढ झाली आहे.

Rice | Agrowon

दक्षिण भारतात उत्पादन कमी झाल्याने मध्य भारतातील तांदळाची मागणी (Rice Demand) वाढलेली आहे. परिणामी, दर वाढू लागले आहेत.

Rice | Agrowon

येत्या आठवड्यात पुन्हा तांदळाचे भाव वधारण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Rice | Agrowon

निर्यात हेच बाजारात तांदळाचे भाव वाढण्याचे कारण आहे. पण यासोबत आणखी काही घटकही कारणीभूत आहेत.

Rice | Agrowon

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा व्यापाऱ्यांकडे तांदळाचा साठा नाही. यासोबतच हवामानानेही धान उत्पादकांना साथ दिली नाही. पीक शेतात असताना अचानक वातावरण उष्ण झाले.

Rice | Agrowon

तसेच वेळेवर पाऊस झाला नाही. भात पीक तयार होत असतानाच पाऊस झाला. त्यामुळे उत्पन्नात सुमारे पाच टक्के घट झाली. सर्वसाधारण ग्राहकांकडूनही नवीन तांदळाची वार्षिक खरेदी केली जात आहे.

Rice | Agrowon
Wari | Agrowon