Team Agrowon
महाराष्ट्रातील इतर नद्यांची अवस्था तर पाहवतच नाही अशी आहे.
राजगुरुनगरला भीमा नदी पाहण्यास पुलावर उभा राहिलो तर खाली फक्त जलपर्णीच दिसत होती.
धरणाचे पाणी सोडल्याशिवाय आमच्या नद्या जिवंत होत नाहीत, ही शोकांतिका आहे.
पूर्वी गाव तेथे नदी होती, नदीचे असणे गावांच्या अस्तित्वासाठी आवश्यक होते.
आता घरोघर नळाचे स्वच्छ पाणी येते.
त्यामुळे नदी असली अथवा नसली तरी आम्हांला त्याचा काहीही फरक पडत नाही.