Rural Life : सह्याद्रीच्या रानातील माणसं

Team Agrowon

भल्या सकाळी देवपूजा करीत रानात गवत कापण्यासाठी काठी टेकत बाबा डोंगराकडे निघाले आहेत.

देव आणि कष्टावर त्यांची समसमान श्रध्दा आहे. या वयातही त्यांना कामच उमेद देते.

दऱ्याडोंगरातील माणसं पोटात अन्न, अंगात कपडा आणि पायात वहाण नसताना मैलोन मैल चालत रहातात.

दिवसभर काम केल्यानंतरही ही मानसं नेहमी हसरी दिसतात. आपण आलिशान एसी मोटारीत फिरूनसुद्धा थकलेलो असतो..!   

ग्रामिण भागात आजही चुलीवरच स्वयंपाक केला जातो. भाकरीसाठी चूल पेटवावी लागेल. त्याची ही तयारी..!

ग्रामिण भागात माणसांना कामातून सवड नसते. यातूनही ते जिवनाचा आनंद जगत असतात.

cta image