Orange Compensation : फळबागायतदारांना नुकसान भरपाई कधी मिळणार ?

टीम ॲग्रोवन

नागपूर ः उपमुख्यमंत्र्यांकडेच पालकत्व असतानाही ऑरेंज सिटीतील संत्रा-मोसंबी उत्पादकांवर २०२१ मध्ये झालेल्या नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

Orange | Agrowon

विशेष म्हणजे लगतच्या अमरावती जिल्ह्यात फळपीक नुकसानीचे सर्व्हेक्षण  करून मदतीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्या शेतकऱ्यांना निधीही मंजूर झाला.

Orange | Agrowon

यापूर्वी २०२१ मध्ये नागपूर जिल्ह्यात १७,८८० संत्रा- मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.

Mosambi | Agrowon

बाधित क्षेत्रात कटोल व नरखेड तालुक्‍यातील १६,७४५ आणि सावनेर व कळमेश्‍वर तालुक्‍यांतील १,१३५ बागायतदारांचा समावेश होता.

Mosambi Market | Agrowon

नुकसानीचे सर्व्हेक्षण करून जिल्हाधिकाऱ्यांनी मदतीचा प्रस्ताव शासनाला पाठविला.

Mosambi Market | Agrowon

त्यामध्ये हे नुकसान ३३ टक्‍क्यांपेक्षा अधिक असल्याचे दर्शविण्यात आले होते. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी या मुद्याकडे दुर्लक्ष केले.

Mosambi Market | Agrowon

परिणामी संत्रा बागायतदारांसाठी निधीची तरतूदच करण्यात आली नाही. परिणामी, बागायतदारांना भरपाईपासून वंचित राहावे लागले.

Mosambi | Agrowon

नुकसानीनुसार, प्रशासनाने काटोल तालुक्‍यासाठी ८ कोटी ३ लाख ७० हजार, नरखेडसाठी ८ कोटी २० लाख ६२ हजार रुपयांच्या निधीची मागणी केली होती. 

Mosambi Stall | Agrowon

परंतु वर्षभराचा कालावधी लोटल्यानंतरही शासनाकडून या फळपीक उत्पादकांना निधी देण्यात आला नाही.

Mosambi Market | Agrowon
cta image | Agrowon