Bharat Jodo : शरद पवार आणि उद्धव ठाकरे 'भारत जोडो'मध्ये सहभागी होणार

Team Agrowon

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) आणि शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thakrey) यांनी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नांदेडमधील भारत जोडो यात्रेचे (Bharat Jodo Yatra) निमंत्रण स्वीकारले आहे.

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, आमदार अमरनाथ राजूरकर, माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री आमदार विश्‍वजित कदम, महाराष्ट्राचे सहप्रभारी बी. एम. संदीप, आमदार सुधीर तांबे, आबा दळवी यांनी सोमवारी (ता. १७) शिष्टमंडळासह

मातोश्रीवर उद्धव ठाकरे तर सिल्व्हर ओक येथे शरद पवार यांची भेट घेतली. कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी सुरू केलेली भारत जोडो यात्रा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नांदेड जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणार असून, आपणही या यात्रेत सहभागी व्हावे,

असे निमंत्रण काँग्रेसच्या शिष्टमंडळाने उभय नेत्यांना दिले. दोघांनीही हे निमंत्रण स्वीकारले आहे.

शरद पवार स्वतः तर शिवसेनेकडून उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यात्रेत सहभागी होणार असल्याचे शिष्टमंडळाला सांगण्यात आले.

cta image