Team Agrowon
देशात अनेक वर्षांत जानेवारीच्या मध्यातही कापूस आवक (Cotton Arrival) कमी आहे.
जादा दरांमध्ये सुरुवातीला कापूस खरेदीसंबंधी (Cotton Procurement) केलेली खोटी प्रसिद्धी व शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याची वृत्तीच यास जबाबदार आहे.
परिणामी, देशातील प्रामाणिक कारखानदारांना याचा फटका बसत असल्याचे मत जाणकार, शेतकरी व्यक्त करीत आहेत.
यंदा कापसाचा उत्पादन खर्च २५ ते ३० टक्क्यांनी अधिक झाला. यात खते, कीडनाशके, तणनाशके या सर्वांच्या दरात मोठी वाढ झाली.
त्यांची टंचाई ही आणखी नवी समस्याही होती. दुसरीकडे देशात कापूस दरांबाबत शेतकऱ्यांची सतत दिशाभूल सुरुवातीपासून होत आहे
कापूस खरेदीचा मुहूर्त गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात किंवा शुभदिनी करण्याचा प्रघात, संकेत अनेक कारखानदार पाळतात.
फुकटची प्रसिद्धी या काटापूजन कार्यक्रमास या मंडळीने भरभरून मिळवून घेतली. या काळात आंतरराष्ट्रीय दरांनुसार कापसाचे कारखान्यात खरेदीचे किंवा खेडा खरेदीचे दर साडेआठ ते नऊ हजार रुपये असायला हवे होते.