Soybean Market : सोयाबीनच्या दरात नरमाई

Anil Jadhao 

अमेरिकेच्या कृषी विभागाने अर्थात युएसडीने जगातील सोयाबीन उत्पादनाचा अंदाज कायम ठेवला. खरतर युएसडीए डिसेंबरमधील आपल्या अहवालात उत्पादनाचा अंदाज कमी करेल, असं वाटत होतं.

अर्जेंटीना आणि ब्राझीलमधील दुष्काळी स्थितीमुळे मागील काही दिवसांपासून युएसडीए या देशांमधील उत्पादनाचा अंदाज कमी करेल, अशी शक्यता होती. मात्र तसे झाले नाही.

आज पामतेलाचे दरही काहीसे नरमले. पामतेलाच्या दरात नरमाई आल्याचा परिणाम सोयाबीनच्या दरावर जाणवला.

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन दर काहीसे नरमले होते. मात्र देशात सोयाबीन दर कायम होते.

आज दशातील बाजारात सोयाबीनला प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ६०० रुपये दर मिळाला.

या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारासह देशातही सोयाबीन दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय.