Soybean Rate : सोयाबीन दरात वाढ होणार ?

Team Agrowon

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आठवडाभरात सोयाबीनचे भाव प्रति क्विंटल सुमारे शंभर रूपयांनी वाढण्याची शक्यता आहे.

Soybean Rate | Agrowon

सध्या सोयाबीनच्या दरात किंचत घट झालेली आहे. परंतु शेतकरी माल रोखून ठेवत टप्प्याटप्प्याने माल बाजारात आणत आहेत.

Soybean Rate | Agrowon

त्यामुळे बाजारावर आवकेचा दबाव नाही. तसेच मलेशियात पामतेलाच्या किंमतीत सुधारणा झाली आहे. त्यामुळे आठवडाभरात सोयाबीनचे दर सुधारण्याचा अंदाज आहे.

Soybean Rate | Agrowon

गेल्या आठवडाभरात इंदूर मार्केटला सोयाबीनचे दर ५६९८ रूपयांवरून ५५३४ रूपयांवर आले. तर अकोला मार्केटला सोयाबीन ५८५८ वरून ५६१८ रूपयांवर आले.

Soybean Rate | Agrowon

काही मार्केटमध्ये दर ५४०० रूपयांवरही पोहोचले होते. परंतु या दरपातळीवत आता शंभर रूपयांची वाढ होऊ शकते, असे जाणकारांनी सांगितले.

Soybean Rate | Agrowon

कारण शेतकरी हुशारीने माल रोखून ठेवत असल्याने बाजारात आवक वाढत नाही. त्यामुळे प्रक्रिया उद्योजकांची गोची झाली आहे.

Soybean Rate | Agrowon

त्यामुळे त्यांनी वाढीव किंमतीला सोयाबीन खरेदी सुरू केली आहे. त्याचा बाजारावर सकारात्मक परिणाम जाणवेल.

Soybean Rate | Agrowon
cta image | Agrowon