Soybean Market : सोयाबीन दरात काहीशी सुधारणा

Anil Jadhao 

देशात आज जवळपास २ लाख क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आले होते. महाराष्ट्रात आज जवळपास ७० हजार टन सोयाबीन विक्रीसाठी आलं होतं. तर मध्य प्रदेशातील आवक ६० हजार क्विंटलच्या दरम्यान होती. राजस्थानमधील आवक ३० हजार क्विंटलवर पोचली.

आज देशातील सोयाबीन दरात क्विंटलमागे ५० ते १०० रुपयांची सुधारणा झाली होती. महाराष्ट्रातील सोयाबीनला आज ५ हजार ३०० ते ५ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. तर मध्य  प्रदेशातील सरासरी दरपातळी ५ हजार ३५० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होती.

प्रक्रिया प्लांट्सचे दर महाराष्ट्रात क्विंटलमागे सरासरी ५० रुपयाने वाढले होते. आज प्रक्रिया प्लांट्सचे दर ५ हजार ८०० ते ५ हजार ९५० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान होते.

मध्य प्रदेशातील प्रक्रिया प्लांट्सच्या दराने ५ हजार ६०० ते ५ हजार ७०० रुपयांचा टप्पा गाठला होता. प्रक्रिया प्लांट्सचे दर वाढल्याने बाजार समित्यांधील दराला आधार मिळाला होता.

पामतेलाचे दर सुधारल्याचा आधार इतर खाद्यतेल बाजाराला मिळतोय. पामतेलाच्या दरात आज टनामागे १०० रिंगीटची सुधारणा झाली. पामतेलाचे वायदे ४००४ रिंगीटने पार पडले. रिंगीट हे मलेशियाचे चलन आहे.

यंदा मागीलवर्षीच्या तुलनेत  सोयापेंड निर्यातीची गती चांगली आहे. त्यामुळे यंदा सोयाबीनला सरासरी ५ हजार ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळू शकतो.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

cta image