Dairy Farming : मुंबईत शिकली पण नोकरीऐवजी तिनं दूध व्यवसायात नाव कमावलं!

Team Agrowon

मूळगाव बाभूळवाडे

बाभूळवाडे (ता. पारनेर, जि. नगर) येथील कोमल रजनीकांत जगदाळे यांनी पशुपालनामध्ये स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहे.

Komal jagadale | Agrowon

जातिवंत दुधाळ गाईंचे संगोपन

हंगामानुसार विविध पिकांची लागवड त्याचबरोबरीने जातिवंत दुधाळ गाईंचे संगोपन, मुक्तसंचार गोठा आणि काटेकोर व्यवस्थापनातून दुग्ध व्यवसाय किफायतशीर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

Komal jagadale | Agrowon

शेतकरी पूरक उद्योग

पारनेर तालुक्यापासून (जि. नगर) २७ किमी अंतरावरील बाभूळवाडे हे तीन हजार लोकसंख्येचे गाव. बहुतांश शेतकरी पूरक उद्योग म्हणून पशुपालनाकडे वळले आहेत. यापैकीच एक आहेत रजनीकांत बाळासाहेब जगदाळे.

Komal jagadale | Agrowon

चार एकर शेती

परंपरागत चार एकर शेती आणि पशुपालन हाच जगदाळे कुटुंबीयांचा मुख्य आर्थिक स्रोत. २०१७ मध्ये रजनीकांत यांचे लग्न मुंबईतील कोमल जयराम गगे यांच्याशी ठरले. कोमल यांचे मूळ गाव जुन्नर तालुक्यातील नळवणे.

Komal jagadale | Agrowon

पदवीधर मुलगी शेती आणि पशुपालनात रमेल का

परंतु वडिलांच्या नोकरीमुळे त्या मुंबईत वास्तव्यास होत्या. मुंबईतील पदवीधर मुलगी शेती आणि पशुपालनात रमेल का, अशी शंका रजनीकांत यांच्या मनात होती. परंतु त्यांच्या मामांनी कोमल यांना शेती, गोपालनाची आवड असल्याचे सांगितले. त्या शेती आणि गाईंचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करतील, असे सांगितल्याने लग्न जमले.

Komal jagadale | Agrowon

होल्स्टिन फ्रिजियन गायींची संख्या आठवर

लग्नानंतर कोमल यांनी कुटुंबाच्या गोठ्यात असलेल्या गाईंच्या व्यवस्थापनाची जबाबदारी घेतले. काही महिन्यांमध्येच चार दुधाळ होल्स्टिन फ्रिजियन गायींची संख्या आठवर नेली. गोठा स्वच्छता, गाईंना चारा कुट्टी देण्यापासून दूध काढण्यापर्यंत सर्व दैनंदिन कामे कोमलताई करतात. यामध्ये त्यांना सासूबाई नर्मदा यांची चांगली मदत होते.

Komal jagadale | Agrowon
Animal | Agrowon