Sugarcane : उसाच्या भरणीची तयारी

Team Agrowon

आडसाली उसाची लागण ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात होत असते. सध्या आडसाली उसाचे पीक जोमात आहे.

पिकाची वाढ चांगली होत असल्याने पिकाला मातीचा आधार देण्याचे काम सुरु आहे. म्हणजेच ऊस सध्या भरणीच्या अवस्थेमध्ये आहे.

कोल्हापूर येथील शेतकरी प्रकाश पाटील यांनी १८ ऑगस्ट रोजी दहा हजार एक या वाणाच्या उसाची लागण केली. त्यांच्या शेतात सध्या उस भरणीचे काम सुरु आहे.

उसाला मातीची भरणी करताना खतांची मात्राही दिले जाते. या वेळी खत दिल्याने त्याचा चांगाल फायदा होतो, असं शेतकरी सांगतात. 

प्रकाश पाटील यांनी भरणी करताना १५ १५ १५ व युरिया खतांचे मिश्रण करून खत दिले.

पावर टिलर ट्रॅक्टरच्या सहाय्याने ही भरणी करण्यात आली. पावर टिलर ट्रॅक्टरच्या सहाय्याने सध्या ९० रुपये प्रति गुंठा या दराने भरणी केली जाते.

cta image