Team Agrowon
कोणत्याही झाडाच्या सुरुवातीची जी कोवळी पाने असतात त्यांना मायक्रोग्रीन म्हणतात.
मायक्रोग्रीनची लागवड कोणत्याही हंगामात करता येत असली तरी हंगामानुसार लागवड करणे फायदेशिर आहे.
कोथिंबीर, मोहरी, कांदा, मुळा, पुदिना, मूग ही पिकं मायक्रोग्रीन म्हणून लागवडीसाठी चांगली असतात.
दररोज ५० ग्रॅम मायक्रोग्रींन्स सेवन केले तर शारीरिक पोषणाच्या सर्व गरजा पूर्ण होतात.
मायक्रोग्रीन्स ची लागवड घरच्या घरी करता येते. लागवडीसाठी सेंद्रिय खत किंवा मातीची गरज असते. मायक्रोग्रीन एका आठवड्यात तयार होते.
इतर फळे आणि भाजीपाल्याच्या तुलनेत या मायक्रोग्रीन मध्ये अधिक पोषक तत्त्वे असतात.त्यामुळे मायक्रोग्रीनला सुपरफुड मानले जात आहे.