Ethanol Production : महाराष्ट्रातून ३६ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा

Team Agrowon

यंदाच्या हंगामात राज्यातील साखर कारखान्यांना १३२ कोटी लिटर इथेनॉल पुरविण्याचे आदेश मिळाले आहेत.

Ethanol Production | Agrowon

यापैकी महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी ३६ कोटी लिटर्सपेक्षा अधिक इथेनॉलचा पुरवठा करण्यात आला आहे. एकूण उद्दिष्टाच्या २८ टक्के इथेनॉलचा पुरवठा करण्यात आला आहे.

Ethanol Production | Agrowon

नुकतीच साखर आयुक्तालयात‘दि इथेनॉल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ची बैठक पार पडली. या बैठकीत इथेनॉल निर्मिती उद्योगातील घडामोडींचा आढावा घेण्यात आला.

Ethanol Production | Agrowon

२०२१-२२ मध्ये राज्यातील साखर कारखान्यांनी इथेनॉलची विक्रमी निर्मिती केली. गेल्या हंगामात देशात इथेनॉल निर्मितीसाठी ३५ लाख टन साखर वळविण्यात आली होती.

Ethanol Production | Agrowon

यामध्ये महाराष्ट्रातील साखरेचा वाटा १५ लाख टनांचा होता. कारखान्यांना सध्या साखरेपेक्षाही इथेनॉल निर्मिती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरत आहे.

Ethanol Production | Agrowon

चालू २०२२-२३ इथेनॉल हंगामात राज्यातील साखर कारखान्यांना तेल कंपन्यांना ते सांगतील त्या राज्यात इथेनॉलचा पुरवठा करावा लागतो.

Ethanol Production | Agrowon

राज्यात इथेनॉल पुरविणे कारखान्यांना परवडते. मात्र, परराज्यात पुरवठा करणे खर्चिक व वेळखाऊ असते.

Ethanol Production | Agrowon
Millet Cultivation | Agrowon