Team Agrowon
पूर्वी शेतात जाऊन झाड-वेलींच्या सावलीत गारव्याला पहुडणे, कैऱ्या खाणे आणि मस्त नदी-विहिरींच्या थंड पाण्यात मनसोक्त पोहणे यात बच्चे कंपनी दिवसभर रमून जात होती.
उन्हाळ्याच्या सुट्टीत तर भर दुपारी घाम-गर्मीपासून सुटका आणि शरीराचा व्यायाम असा दुहेरी हेतू पोहण्याने साध्य होत असे.
त्यामुळेच बच्चे कंपनी जमली, की प्रवाहाच्या उलट्या दिशेने पोहणे, पाण्यातला लपंडाव, एकमेकांना शिवणे असे खेळ रंगत असतं.
या सर्व माहोलमध्ये पोहता न येणारे देखील भोपळा, ट्यूब बांधून पाण्यात उड्या घेत आणि लवकरच पोहायलाही शिकत.
आता मात्र राज्याच्या बहुतांश भागात नद्या उन्हाळ्यात आटत आहेत. विहिरीही तळ गाठून असतात.
मुख्य म्हणजे पोहण्यासाठी पाणी उपलब्ध असले, तरी आताची तरुण पिढी स्क्रीनवरून हटायला तयारच नाही.