Mahila Maharashtra Kesari Kusti : अकलूजमध्ये रंगला ताराराणी महिला केसरी कुस्ती स्पर्धांचा आखाडा

Team Agrowon

ताराराणी महिला केसरी

सोलापूर जिल्ह्यातील अकलूजमध्ये ताराराणी महिला केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

Mahila Maharashtra Kesari Kusti | Agrowon

देशभरातील महिला कुस्तीपटूंचा सहभाग

राज्यातील पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी देशभरातील १० राज्यातून ७०० हून अधिक महिला कुस्तीपटूंनी सहभागी झाल्या आहेत.

Mahila Maharashtra Kesari Kusti | Agrowon

चांदीची गदा

महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकणाऱ्या स्पर्धकाला एक लाख रुपये रोख आणि चांदीची गदा देण्यात येणार आहे.

Mahila Maharashtra Kesari Kusti | Agrowon

सोनाली कुलकर्णीची उपस्थिती

मराठी सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या उपस्थितीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

Mahila Maharashtra Kesari Kusti | Agrowon

स्पर्धेचे उद्घाटन

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्यासह सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी , आमदार रणजितसिंह मोहिते पाटील , संयोजिका शितलदेवी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

Mahila Maharashtra Kesari Kusti | Agrowon

ज्योत प्रज्वलित

ताराराणी महिला केसरी कुस्ती स्पर्धेचा प्रारंभ महिलांनी ज्योत प्रज्वलित करून झाला. यावेळी सोनाली कुलकर्णी आणि इतर महिलांच्या हस्ते कुस्ती लावण्यात आली.

Mahila Maharashtra Kesari Kusti | Agrowon

स्पर्धकांची मिरवणूक

स्पर्धेत सहभागी झालेल्या महिला कुस्तीपटूंची हलगीच्या तालात भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली.

Mahila Maharashtra Kesari Kusti | Agrowon
Turkey Bajari Variety | Agrowon