Millets Year 2023 : मुख्यमंत्र्यांनी कापला भरडधान्यापासून तयार केलेला केक

Team Agrowon

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाच्या निमित्ताने मंत्रालयातील आवारात महाराष्ट्र मिलेट मिशन या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

Millets Year 2023 | Agrowon

या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर,आ.भरत गोगावले,आ. जयस्वाल,कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले,कृषी आयुक्त सुनील चव्हाण उपस्थित होते.

Millets Year 2023 | Agrowon

तसेच शेतकरी व कृषी विभागाचे अधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Millets Year 2023 | Agrowon

या वेळी मंत्रालयात शेतकरी उत्पादक कंपन्यांनी तयार केलेल्या भरडधान्यांच्या उपपदार्थांची दालने उभारण्यात आली असून येथे विविध पदार्थांची विक्रीही केली जात आहे.

Millets Year 2023 | Agrowon

या वेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, कुटकी ही पिके घेतली जातात.

Millets Year 2023 | Agrowon

या पिकांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील मान्यता मिळवून देण्यास यंदा संयुक्त राष्ट्रसंघातर्फे साजरे होणारे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष उपयुक्त ठरेल.

Millets Year 2023 | Agrowon

महाराष्ट्र मिलेट मिशनमुळे नवी पिढी जंकफूडकडून पारंपरिक तृणधान्याद्वारे बनविलेल्या पदार्थांकडे निश्चितपणे वळेल. शेतकऱ्यांच्या उत्पादनालाही चांगला भाव मिळेल.

Millets Year 2023 | Agrowon
Sahitya Samelan | Agrowon