रेशीम उत्पादनांची निर्यात रुळावर

Devendra Shirurkar

गेल्या सहा वर्षांतील घसरणीनंतर भारतातील रेशीम उत्पादनांची निर्यात रुळावर येऊ लागली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निर्यातीचे उत्पन्न ३६ टक्के वाढले आहे.

Silk Production | Agrowon

अमेरिका आणि युरोपमधून रेशीम गालिचे आणि तयार कपड्यांना मागणी वाढल्यामुळे निर्यातीत सुधारणा झाली आहे.

Silk Made Clothes | Agrowon

२०२०-२१ मध्ये रेशीम उत्पादनांच्या निर्यातीने सहा वर्षांतील तळ गाठला होता. २०२१-२२ मध्ये मात्र निर्यातीची स्थिती सुधारली.

Silk Made | Agrowon

यावर्षी निर्यातीच्या माध्यमातून सुमारे १९२६ कोटी रूपये मिळाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पन्नात ३६ टक्के वाढ झाली आहे. डॉलरच्या भाषेत उत्पन्नातील वाढ ३५ टक्के भरली.

Silk Carpet | Agrowon

गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे विकसित देशांकडून रेशीम उत्पादनांची मागणी घटली होती. यंदा मात्र हे चित्र बदलले असून रेशीम उत्पादनांच्या मागणीत वाढ झाली आहे.

Silk | Agrowon

अमेरिका आणि युरोपिय देशांमधून रेशीम गालिचे, तयार कपड्यांची खरेदी वाढली. येत्या आर्थिक वर्षातही ही मागणी आणखी वाढण्याची अपेक्षा या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Silk | Agrowon