मूग आणि उडदाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली

टीम अॅग्राेवन

मागील काही वर्षांत हमीभावापेक्षा कमी दर, उशिरा पडणारा पाऊस, पावसाचा खंड आदी कारणांमुळे दिवसेंदिवस या पिकांची पेरणी घटत आहे.

कमी कालावधीमध्ये येणारी व अधिक आर्थिक नफा मिळवून देणारी पिके म्हणून मूग आणि उडदाकडे पाहिले जाते. साधारणपणे या पिकांचा कालावधी दोन ते अडीच महिन्यांचा असतो.

पेरणीयोग्य पाऊस पडल्यावर व जमीन वापसा स्थितीत आल्याबरोबर शक्यतो जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापर्यंत या पिकांची पेरणी पूर्ण केली जाते. परंतु गेल्या काही वर्षांपासून पावसाचे उशिराने आगमन, पावसात पडणारा खंड तसेच विशेषतः ऑगस्ट महिन्यात होणारी अतिवृष्टी याचा परिणाम मूग उडीद पिकाच्या लागवडीवर होऊ लागला आहे.

पाऊस उशिरा झाल्यामुळे उत्पादकतेबाबत अस्पष्टता येते. जून महिन्यात लागवड झाल्यानंतर साधारणतः ऑगस्ट महिन्यात पीक काढणीला येते. परंतु याच काळात अतिवृष्टी होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मुगाची काढणी करता येत नाही.

पावसामुळे परिपक्व झालेल्या शेंगा फुटतात. फुटलेल्या शेंगातील दाणे शेंगांमध्येच उगवतात. परिणामी संपूर्ण पीक वाया जाते किंवा उत्पन्न कमी मिळते. अनेक भागात पडणारा दुष्काळ, पावसाचा ताण यामुळे देखील मूग, उडीद लागवडीकडे शेतकऱ्यांचा ओढा कमी झाला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.