Rain Update : ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस

टीम ॲग्रोवन

मॉन्सूनोत्तर हंगामात (ऑक्टोबर ते डिसेंबर) दक्षिण भारतात सर्वाधिक पाऊस पडतो.

Monsoon Rain | Agrowon

या कालावधीत दक्षिण भारतात यंदा ८८ ते ११२ टक्के म्हणजे सरासरी इतक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Monsoon Rain 2 | Agrowon

यातच या कालावधीत महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची  शक्यता आहे.

Rainfall | Agrowon

वायव्य भारताच्या बहुतांश भागातून मॉन्सून परतला आहे. उर्वरित देशात मॉन्सून सक्रिय आहे.

Rainfall | Agrowon

मॉन्सून वारे देशातून गेल्यानंतर दक्षिण भारतातील तमिळनाडू,पदुच्चेरी, कराईकल,आंध्रप्रदेशचा सीमावर्ती भाग, येमेन, रायलसीमा, केरळ, दक्षिण अंतर्गत कर्नाटक या भागात ईशान्य मोसमी वारे सक्रिय होते.

Monsoon Forest | Agrowon

दीर्घकालीन सरासरीनुसार मॉन्सूनोत्तर हंगामात दक्षिण भारतात ३३४.१३ मिलिमीटर पाऊस पडतो.

Monsoon Beach | Agrowon

 यंदाच्या हंगामात सरासरी इतक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यात संपूर्ण देशाचा विचार करता अति उत्तरेकडील

Monsoon Beach | Agrowon

राज्यांसह वायव्य आणि ईशान्य भारताचा काही भाग वगळता उर्वरित देशात या काळात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे

Monsoon | Agrowon

वर्षअखेरपर्यंत ला-निना स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. तर भारतीय समुद्रामध्ये सध्या निगेटिव्ह आयओडी स्थिती आहे. ती वर्षाअखेर तटस्थ होण्याची शक्यता आहे.

Monsoon Beach | Agrowon
cta image | Agrowon