मनोज कापडे
भटकंतीत या झोपडीत थांबलो आणि महालातील सुख अनुभवलं..!
एक असा गाव भटकंतीत पाहिला की जेथे दूध आणि पाणी मिळवण्यासाठी सारखीच झुंज द्यावी लागत होती. दूध किंवा पाणी वाहून नेण्यासाठी समसमान कष्ट घ्यावे लागत होते..!
भटकंतीचा आनंद हा असा असतो. भटकंतीत समस्या असतात. जोखीम असते. पण, निसर्गात आमच्या आसपास नजरा या फुलांसारखा मनोहारी, आनंददायी असतो..!
या रम्य तळ्याकाठी काल विसावलो होतो. निसर्ग, सूर्य, जलाशय, वारा आम्ही सारेच ध्यानस्थ होतो. केवळ रानपाखरे मंद शीळ घालत होती..!
या भेटीत फुल मला म्हणाले : जीवन हे असं पवित्र, शीतल असावं. आपणच आपलं एकांतात हसावं. माझ्यामुळे जग का रुसावं..?
नववर्षाच्या स्वागताची ही अशी तयारी सुरू आहे. भाजी-भाकरीची जबाबदारी सौभाग्यवतींची; तर चूल पेटती ठेवायची जबाबदारी माझ्याकडे.