Tomato Market Fraud Nashik : व्यापाऱ्यांनी टोमॅटो उत्पादकांना दीड कोटीला गंडवलं

Team Agrowon

शेतकऱ्यांकडून टोमॅटोची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याने एक कोटी ८० लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच घडला. हे टोमॅटो व्यापारी शेतकऱ्यांचे पैसे न देता फरारी झाल्याने शेतकरी हलावदिल झाले आहेत.

Tomato Thief | Agrowon

सोमवारी (ता. २७) शेतकऱ्यांनी बाजार समितीचे सचिव अरुण काळे यांना निवेदन देत पैसे मिळून देण्याची मागणी केली. या व्यापाऱ्याविरोधात पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल झाली आहे.

Tomato Thief | Agrowon

पेठ रोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्डात जिल्ह्याभरातील विविध भागांतून टोमॅटो विक्रीसाठी येतो. टोमॅटो व्यापारी नौशाद फारुकी व शमशाद फारुकी यांनी सप्टेंबर २०२२ ते ऑक्टोबर २०२२ यादरम्यान शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी केले. मात्र त्याचे पैसे दिले नाहीत.

Tomato Thief | Agrowon

ज्या शेतकऱ्यांना त्यांनी धनादेश दिले, ते बाउन्स झाले. या व्यापाऱ्याकडून १७९ शेतकऱ्यांना सुमारे १ कोटी ८० लाख रुपये येणे बाकी आहे. व्यापारी पैसे देण्यास टाळाटाळ करीत होते.

Tomato Thief | Agrowon

ते सध्या फरार आहेत. व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून त्यांच्या गाळे व मालमत्तांचा लिलाव करून शेतकऱ्यांचे पैसे मिळवून द्यावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

Tomato Thief | Agrowon

नाशिक बाजार समिती प्रशासनास या प्रकरणी माहिती उपलब्ध झाली. व्यापाऱ्याने विकलेला गाळा ताब्यात घेतला. त्याची विक्रीप्रक्रिया सुरू केली आहे.

Tomato Thief | Agrowon
Flamingo | Agrowon