Nilwande Dam : तब्बल 38 वर्षांनंतर निळवंडे धरणाचे पाणी पोहचले संगमनेरात

Swapnil Shinde

नगरमधील महत्वाचा प्रकल्प

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निळवंडे (उर्ध्व प्रवरा प्रकल्प) धरण जिल्ह्यातील दुष्काळी व जिरायत भागाला सुजलाम् सुफलाम् करणारा प्रकल्प ठरणार आहे.

Nilwande Dam | agrowon

१९९२ मध्ये धरणाच्या कामाला सुरुवात

अकोले तालुक्यातील प्रवरा नदीवर १९८५ पासून निळवंडे धरण प्रकल्प प्रस्तावित होता. या धरणाला १९९२ मध्ये प्रत्यक्ष कामास प्रारंभ झाला. अनेक अडचणींवर मात करून धरण पूर्ण केले.

Nilwande Dam | agrowon

पाणी सोडून चाचणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते ३१ मे रोजी अकोले तालुक्यातील निळवंडे धरणातून डावा कालव्यात पाणी सोडून चाचणी सुरु करण्यात आली.

Nilwande Dam | agrowon

डाव्या कालव्यातून पाणी सोडले

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला निळवंडे प्रकल्प पूर्ण झाला असून पहिल्यांदा डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले.

Nilwande Dam | agrowon

जलपूजन

संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव कोंझिरा येथील बोगद्यालगत डाव्या कालव्यात बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.

Nilwande Dam | agrowon

आनंदाचा क्षण

अथक परिश्रमातून साकारलेल्या कालव्यातून संगमनेर तालुक्यात आलेले पाणी हा जीवनातील आनंदाचा क्षण असल्याची भावना बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.

Nilwande Dam | agrowon

नगर आणि नाशिक जिल्ह्याला फायदा

निळवंडे प्रकल्पाचा फायदा अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यतील अनेक गावांना होणार आहे.

Nilwande Dam | agrowon

दुष्काळ हटणार

धरणाचे पाणी पोहचल्यामुळे उत्तर नगर जिल्ह्यातील १८२ दुष्काळी गावांचा पिण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

Nilwande Dam | agrowon
monsoon season | agrowon