Team Agrowon
अल निनोसाठी अनुकूल वातावरण तयार होण्यास सुरुवात झाली आहे. त्याचा परिमाण मान्सूनवर होण्याची शक्यता आहे
भारतीय हवामान विभागाचा (IMD) ने आज मान्सूनच्या पावसा संदर्भात दुसरा अंदाज जाहीर झाला आहे.
माॅन्सून काळात एल निनो आणि आयओडी दोन्ही वातावरणीय स्थिती सक्रिय होतील. त्यामुळे देशपातळीवर सरासरी पाऊसमान राहील.
संपूर्ण देशात यंदा जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये मान्सून सरासरी 96 टक्के कोसळण्याची शक्यता आहे.
देशात अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याचा अंदाज आहे.
त्यामुळे महाराष्ट्रातील मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र विभागात सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
विदर्भाच्या काही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता अधिक आहे.
यंदा शेतकऱ्यांनी पेरणी करताना जरा सबुरी राखावी, असा सल्ला कृषी विभागाच्यावतीने देण्यात आला आहे.