Indian Tourism : कोरोना साथीनंतर पर्यटन ‘रुळा’वर

टीम ॲग्रोवन

जानेवारी ते सप्टेंबर २०२२ दरम्यान गतवर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत विश्रांतीसाठीच्या पर्यटनामध्ये ६२ टक्‍के वाढ झाली आहे.

Tourist in Agra | Agrowon

‘ओयो’ने केलेल्या जागतिक पर्यटन दिन अहवालात त्याबद्दल माहिती देण्यात आली आहे.देशांतर्गत पर्यटनाला चालना मिळाली आहे.

Jaipur | Agrowon

जयपूर व गोवा ही भारतातील लोकप्रिय पर्यटनस्‍थळे म्हणून आघाडीवर आहेत.

Varanasi | Agrowon

कोची, वाराणसी आणि विशाखापट्टणमही भारतीय पर्यटकांमध्ये अव्वल क्रमांकाची स्‍थळे म्हणून उदयास आली आहेत.

Beach Tourism | Agrowon

समुद्रकिनारा असलेल्या ठिकाणाकडे पर्यटकांचा अधिक कल असल्याचे दिसून येते.

Taj Mahal | Agrowon

२०२२ च्या पहिल्या दोन तिमाहीत दिल्ली, हैदराबाद, बेंगळुरू, कोलकाता आणि चेन्नई भारतातील अव्‍वल व्यावसायिक स्थान म्हणून अग्रस्थानी आहे.

Deharadun | Agrowon

विश्रांतीच्या ठिकाणांसाठी जयपूर, गोवा, नागपूर, डेहराडून आणि वाराणसी यांना सणासुदीच्या काळात मागणी वाढेल.

Hill Station | Agrowon

१०० पर्यटनस्थळांच्या विश्लेषणानुसार जवळपास २५ टक्‍क्‍यांसह बहुतेक हिल स्टेशन ऑक्टोबर-डिसेंबर २०२२ दरम्यान सर्वाधिक पसंतीची ठिकाणे असण्याचा अंदाज आहे.

Ellora Caves | Agrowon

२० टक्‍के हेरिटेज शहरे आणि जवळपास १० टक्‍के समुद्रकिनाऱ्यांची ठिकाणांनाही पसंती मिळेल. प्रयागराज, रायपूर, पुरी, नाशिक, बरेली इत्यादींसारखी स्थळेही यादीत समाविष्ट आहेत.

cta image | Agrowon