Team Agrowon
हवा-पाणी पिऊन पिकं डौलानं डोलू लागत. त्यातलं मुख्य पीक बाजरी. ती पोटऱ्यात आली, चिकारली की धन्याला राखणाचे वेध लागत.
मचानावर उभं राहून गोफणगुंडा फिरवला जायचा. पाखरं मोठी हुशार, भुर्रकन अशी गेली की अशी यायची.
टपोरे, चंदेरी दाणे लगडलेल्या कणसांकडं धनी केवढ्या कृतार्थ भावनेनं बघत असत.
वेटाळणीची कामं सावडी-वावडी उरकली जायची.
वाईच उशीर झाला, खालच्या-वरच्या वावरातली वेटाळणी झाली की थव्यानं पाखरं यायची.
वात आणायची. म्हणून हे काम वेळत होणं महत्त्वाचं.