Tur Market : देशात तूर आयात वाढली

Anil Jadhao 

सध्या महिन्याला एक लाख टन तूर आयात होत असली तरी हातोहात मालाचा निपटारा होत आहे. त्यामुळे तुरीचे दर कमी होण्याची शक्यता नाही.

देशात ऑक्टोबर महिन्यात ९५ हजार २१९ टन तुरीची आयात झाली. यापैकी तब्बल ८५ टक्के तूर आफ्रिकेतील मोझांबिक, सुदान, मालावी आणि टंझानिया या देशांमधून झाली.

टंझानियामधून ३० हजार ११७ टन आयात झाली. तर मोझांबिकमधून २८ हजार ५५ टन तूर देशात आली. सुदान या देशातून ११ हजार ४९२ टन तर मालावी देशातून ११ हजार ७५४ टन तूर देशात आयात झाली.

आफ्रिकेतील यार देशांमधून ऑक्टोबर महिन्यात ८१ हजार ४२० टन तूर आयात झाली. तर म्यानमार या देशातून १३ हजार ७९९ टनांची आयात झाली.

डिसेंबरच्या मध्यापासून कर्नाटकात काही ठिाकणी नव्या तुरीची आवक सुरु होईल. मात्र बाजारात आवकेचा दबाव जानेवारीपासून येण्यास सुरुवात होईल. पण यंदा देशातील तूर उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. 

सध्या देशातील बाजारात तुरीला ७ हजार ते ८ हजार रुपये दर मिळतोय. पुढील काळातही तुरीच्या दरातील तेजी कायम राहण्याचा अंदाज असल्यानं सरकारने तूर आयात वाढविण्याचा निर्णय घेतला. मात्र तरीही तुरीच्या दरातील तेजी कायम राहील, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी केला आहे.

cta image