Tur Market : देशात तुरीचे दर का वाढले?

Anil Jadhao 

देशात आतापर्यंत तुरीची लागवड ३६ लाख ११ हजार हेक्टरवर झाली. मागील वर्षी याच काळातील लागवड ४१ लाख ७५ हजार हेक्टरवर होती. म्हणजेच यंदा १३.५१ टक्क्याने तूर लागवड कमी झाली.

Tur Market | Agrowon

देशात तुरीची जास्त उत्पादकता आणि चांगली गुणवत्ता यासाठी तेलंगणा राज्याचा नावलौकिक आहे. परंतु तिथे यंदा तूर लागवड ४५ टक्क्यांनी घटली आहे.

Tur Market | Agrowon

महाराष्ट्रात ११ टक्क्याने तूर लागवड घटली. तर कर्नाटकात १० टक्के तूर लागवड कमी झाली आहे.

Tur Market | Agrowon

मागील हंगामात तुरीच्या तुलनेत मूग आणि इतर कडधान्याचे दर चांगले होते. तर यंदा तुरीपेक्षा मूग आणि इतर कडधान्यांच्या हमीभावातील वाढ अधिक आहे.

Tur Market | Agrowon

खरिपात तुरीची लागवड कमी होऊन, शेतकऱ्यांनी मुगाला पसंती दिल्याचं जाणकारांनी सांगितलं. आतापर्यंत देशात मुगाची लागवड गेल्या वर्षीपेक्षा १६ टक्क्यांनी वाढलीय.

Tur Market | Agrowon

तूर उत्पादनात महत्वाच्या महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यांत जुलै महिन्यात सतत पाऊस झाला. त्यामुळं पिकाला फटका बसला.

Tur Market | Agrowon

खरिपात लागवड झालेल्या तुरीचं मोठं नुकसान झालं. प्राथमिक अंदाजानुसार देशात तुरीचं २० टक्क्यांपर्यंत नुकसान झालं.

Tur Market | Agrowon

सध्या देशात म्यानमार येथील लेमन तुरीची आयात होत आहे. मात्र या तुरीचे दर अधिक असतात. सध्या म्यानमारची लेमन तूर ७ हजार ३५० रुपये प्रतिक्विंटलने आयात होत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tur Market | Agrowon