Tur Rate : तूर यंदा भाव खाणार

Anil Jadhao 

 देशात सध्या तुरीचे दर तेजीत आहेत. तुरीला सध्या बाजारांमध्ये ७ हजार ते ७ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय.

यंदा देशातील तुरीची लागवड जवळपास ५ टक्क्यांनी घटलीये. देशात आत्तापर्यंत ४५ लाख ७३ हजार हेक्टरवर तुरीची लागवड झाली आहे.

केंद्र सरकारनेही यंदा तुरीचं उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा साडेचार लाख टनांनी कमी राहीलं, असा अंदाज जाहीर केलाय.

सरकारच्या मते यंदा देशातील तुरीचं उत्पादन जवळपास ३९ लाख टनांवर स्थिरावेल. त्यामुळं तुरीच्या दराला आणखी आधार मिळू शकतो.

सरकारनं ३९ लाख टन उत्पादनाचा अंदाज जाहीर केला. मात्र उद्योगाच्या मते २७ ते ३० लाख टनांपेक्षा जास्त उत्पादन होणार नाही.

यंदा तुरीला ८ हजार ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

cta image